InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘सत्तेच्या नशेत राहून झिंगल्यासारखे तर्राट बोलणे बरे नाही’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच सत्ता हवी आहे, पण चोवीस तास सत्तेच्या नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शनिवारी पुण्यातील कार्यक्रमात भाजपने ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याच मुद्यावरुन सामनातून भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

‘सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही. महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले आहे.’ अशी सामनातून टीका करण्यात आली आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.