देवेंद्र फडणवीस ‘मावळते मुख्यमंत्री’; शिवसेनेचा हल्ला

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. महायुतीमध्ये मंत्रीपदांवरून वाद सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागांच्या वाटपासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाली होती.

या बैठकीत सत्तेचं समसमान वाटप करु, यावर दोन्ही पक्षांनी संमती दर्शवली होती.  त्यामुळे शिवसेनेने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. ही मागणी भाजपने अमान्य केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘सामना’ या मुखपत्राद्वारे शिवसेना भाजपला लक्ष्य करत आहे. आजच्या ‘सामना’मधील आग्रलेखाद्वारे शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. ‘सामना’मध्ये आज मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘मावळते मुख्यमंत्री’ म्हणून केला आहे. “दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची!” असं म्हणत ‘सामना’नं फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.