‘मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा’

“मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा,” अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत घेतली. “लोकसभेवेळी जे ठरलंय, ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाहीत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत घेतलेली भूमिका आजही कायम ठेवली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखीच वाढला आहे. परिणामी सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपवरील दबाव आणखीच वाढला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीत भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांशी बोलताना शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. लोकसभेवेळी जे ठरलंय ते व्हावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.