‘काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले’; आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या CAB मंजुरीवेळी सभात्याग करणाऱ्या शिवसेनेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना शेलारांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने बुधवारी राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली. परंतु मतदानावेळी शिवसेनेचे तीनही खासदार गैरहजर राहिले. काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने विधेयकाला विरोध केला असला तरी प्रत्यक्ष मतदान विरोधात न करून एकप्रकारे सत्ताधारी भाजपलाच मदत केल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.