अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा; शिवसेनेला मोठा धक्का

महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तार झाला. तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र अनेक अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नमिळाल्याने महाविकास आघाडीत अनेक नेते नाराज होते. अशातच आता शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी ते नाराज होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नाराजीची सुरवात इथेच झाली असल्याने त्यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुन खोतकर अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यात येत आहे. त्यांची समजूत काढत आहेत.

शिव भोजन थाळी फक्त 18 हजार नागरिकांनाच 10 रुपयांत थाळी

उद्धव ठाकरे सरकारचं संभाव्य खातेवाटप

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,

अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन

एकनाथ शिंदे – नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम

सुभाष देसाई – उद्योग

अनिल परब – मुख्यमंत्री कार्यालय

आदित्य ठाकरे – पर्यावरण

उदय सामंत – परिवहन

बाळासाहेब थोरात- महसूल

अमित देशमुख- शालेय शिक्षण

जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण,

नवा मलिक – कामगार

अनिल देशमुख- गृहमंत्रालय

धनंजय मुंडे – सामाजिक न्याय

जयंत पाटील- जलसंपदा

राजेंद्र शिंगणे- आरोग्य

दिलीप वळसे-पाटील- उत्पादन शुल्क

राजेंद्र शिंगणे – आरोग्य

यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण

खातेवाटपावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नव्हती. मात्र आता अखेर काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर आज काँग्रेसची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही एकत्रित यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्याला राज्यपाल यांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर आज दुपारपर्यंत खातेवाटपाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर आज ‘मातोश्री’वर

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा