‘कुणी कुणाला भेटावं यावर बंदी नाही’; खडसेंच्या राजकीय भेटीनंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी सध्या चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र राजकारणात कुणीही कुणालाही भेटू शकतं, असं शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

कुणी कुणाला भेटावं यावर बंदी नाही. एकनाथ खडसे सर्वांचे मित्र आहेत. शिवसेना-भाजपची युती असताना त्यांनी अनेक नेत्यांसोबत एकत्र काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षाचे स्नेहसंबध आहेत. त्यामुळे या भेटींचा वेगळा अर्थ काढू नये. लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावं याचा सर्वांना अधिकार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.