InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘कायदा हा कोणत्या पक्षाचा नसतो’; नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

शिवसेनेने काल नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. राज्यात काँग्रेससोबत असणारी शिवसेना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान करेल अशी पेक्षा होती. मात्र या सर्वाला राजकीय वळण देऊ नये. कायदा हा कोणत्या पक्षाचा नसतो, असं माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी जी राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडली, त्याला धरुन राष्ट्रहिताचा एखादा विषय आला तर आम्ही त्याला समर्थन करु. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश हे मुस्लीम राष्ट्र आहेत. त्यामुळे तेथे मुस्लीम अल्पसंख्यांक असू शकत नाहीत. म्हणून हिंदू, शीख, पारशी, जैन यांना अटी-शर्थींसह नागरिकत्व देण्यासाठी हे विधेयक आहे. आपले राज्यकर्ते राष्ट्रहिताचा विचार करुनच हे विधेयक मांडत आहेत, असं नाही. म्हणूनच राजकीय हेतू नसेल तर नव्याने नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांना 25 वर्ष मतदानापासून दूर ठेवा, अशी मागणी शिवसेनेनं केली, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

Loading...

शिवसेनेची 25 वर्षांची मागणी मान्य झाली नाही, तरीही शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. कारण शरणार्थींना आश्रय द्यायचा की नाही यासाठी हे विधेयक आहे. आमच्या सूचना आम्ही वारंवार मांडत राहू. ती देशहिताची मागणी होती म्हणून आम्ही मांडली होती. प्रत्येक गोष्टीला धर्माचा रंग देणे चुकीचे आहे. राष्ट्रहिताच्या मुद्यांना शिवसेनेचं समर्थन असणार आहे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.