अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणतात…

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेत मोठा वाटा असलेले खासदार संजय राऊत यांनी सत्तार यांनी नेमका का राजीनामा दिला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील,  असे त्यांनी सांगितले.

राऊत यांना खातेवाटपाबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘खातेवाटप हा काय गंमतीचा विषय असू नये. सगळेच खाते तोलामोलाचे असतात कोणतेही खाते कमी जास्त वजनाची नसतात. कोणतेही खाते मिळाले तरी राज्याचा विकास करणे हे मंत्र्यांचे काम असते. कॅबिनेट मंत्र्याने आपल काम चोख करावे, असे मतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. खातेवाटपाच्या विलंबाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारा, असे राऊत म्हणाले.

अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा; शिवसेनेला मोठा धक्का

दरम्यान, अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नाराजीची सुरवात इथेच झाली असल्याने त्यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. अर्जुन खोतकर अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यात येत आहे. त्यांची समजूत काढत आहेत.

पवार साहेब लोकशाही मार्गाने काहीही घडवू शकतात – संजय राऊत

खातेवाटपावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता होताना दिसत नव्हती. मात्र आता अखेर काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर आज काँग्रेसची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही एकत्रित यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्याला राज्यपाल यांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर आज दुपारपर्यंत खातेवाटपाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा