…तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते- शिवसेना

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे हैदराबादचे ओवेसी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी निर्माण करून निवडणुकीत उतरले, पण सात-आठ मतदारसंघ वगळता त्यांना मतदान झाले नाही. संभाजीनगरात वंचित आघाडीच्या इम्तियाज जलील यांचा विजय हा अपघात आहे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघात हिंदू मतांमध्ये फूट पाडून लाखभर मते वळवली. हे घडले नसते तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते. महाराष्ट्रातून, खास करून संभाजीनगरातून ‘ओवेसी’ यांच्या पक्षाचा खासदार निवडून जावा हे दुर्दैव आहे.

संपूर्ण देशात हिंदुत्वाची लाट उसळली, पण महाराष्ट्रात संभाजीनगर हरले व औरंगाबाद जिंकले. हा धक्का आहे. असं म्हणत शिवसेनेनं सामना संपादकीयातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...

सामना संपादकीय

नरेंद्र मोदी विजयी होणार असे ज्यांना वाटत होते त्यांनीही आश्चर्यचकित व्हावे असे अफाट, अभूतपूर्व आणि अलौकिक यश भाजपसह ‘एनडीए’ने संपादन केले आहे. 2014 साली मोदी जिंकलेच होते, पण त्या विजयात मनमोहन सिंग व राहुल गांधींचा वाटा जास्त होता. काँग्रेसचे बदनाम नेतृत्व व मनमोहन सरकार कुचकामी ठरल्यामुळे लोकांनी मोदी यांना संधी दिली. यावेळी ते चित्र नव्हते. मोदी यांनी पाच वर्षे सत्ता राबवली. त्यामुळे त्यांची लढाई स्वतःशीच होती, पण मोदींनी मिळविलेले यश हे 2014 च्या त्यांच्याच यशापेक्षाही मोठे आहे आणि हे यश त्यांनी केवळ स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मिळविलेले आहे. हा मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड विजय आहे. असे यश याआधी फक्त इंदिरा गांधी यांनाच मिळाले होते.

उत्तर प्रदेशची मक्तेदारी संपली

फक्त उत्तर प्रदेशच हिंदुस्थानचा पंतप्रधान ठरवेल ही समजूत आणि अंधश्रद्धा या निवडणूक निकालाने उद्ध्वस्त केली. उत्तर प्रदेशने मोठे यश दिले नसते तरी संपूर्ण देशाने मतदान करून मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम ठेवले असते. मुसलमान-यादव व दलित मतांची बेरीज अखिलेश व मायावती यांच्या महाआघाडीमुळे मजबूत होईल व भारतीय जनता पक्षाची उत्तरेत पीछेहाट होईल असे गणित मांडले गेले होते, पण उत्तरेत नेमके उलट घडले. कनोज या यादवांच्या बालेकिल्ल्यात अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव पराभूत झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात, राजस्थानात, मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. लोकांनी जात व धर्माच्या आघाडय़ा मोडून मोदी यांना मतदान केले. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे हैदराबादचे ओवेसी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी निर्माण करून निवडणुकीत उतरले, पण सात-आठ मतदारसंघ वगळता त्यांना मतदान झाले नाही. संभाजीनगरात वंचित आघाडीच्या इम्तियाज जलील यांचा विजय हा अपघात आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघात हिंदू मतांमध्ये फूट पाडून लाखभर मते वळवली. हे घडले नसते तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते. महाराष्ट्रातून, खास करून संभाजीनगरातून ‘ओवेसी’ यांच्या पक्षाचा खासदार निवडून जावा हे दुर्दैव आहे. संपूर्ण देशात हिंदुत्वाची लाट उसळली, पण महाराष्ट्रात संभाजीनगर हरले व औरंगाबाद जिंकले. हा धक्का आहे.

‘किंगमेकर्स’ पराभूत

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांना ‘किंगमेकर’ म्हणून भूमिका बजावायची होती. मात्र स्वतः चंद्राबाबू हे विधानसभा गमावून बसले व लोकसभेतही त्यांचा पक्ष हरला. आंध्रची विधानसभा वाय.एस.आर. काँग्रेसने जिंकली. आंध्रात लोकसभेच्या 25 पैकी 24 जागा जगन यांच्या वाय.एस.आर. काँग्रेसने जिंकल्या. तेथे भाजपचाही पराभव झाला. तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला 17 जागा मिळतील व त्या बळावर आपण दिल्लीच्या सत्तेत किंगमेकर होऊ असे स्वप्न ते पाहत होते. तेथे त्यांना आठ जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या निकालाचे वैशिष्टय़ असे की, मतदारांनी ‘थेट’ राजा निवडला. किंगमेकरची भूमिका कुणावरच ठेवली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेना, जनता दल युनायटेड व रामविलास पासवान यांना चांगले यश मिळाले, पण भारतीय जनता पक्षालाही पूर्ण बहुमताचा आकडा मिळाला आहे. हे 2014 साली झाले व 2019 साली दुसऱयांदा झाले. दक्षिणेतील केरळ, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांत मोठे यश मिळाले नाही, पण उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक ही राज्ये ठामपणे मोदींच्या मागे उभी राहिली. दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड ही लहान राज्येही शंभर टक्के मोदींनाच सर्व खासदार देऊन गेली. मोदींच्या लाटेत पुन्हा अनेक जण तरले. 2014 सालचीच ही पुनरावृत्ती. मतदारांनी उमेदवार पाहिले नाहीत, मोदींकडे पाहिले. ‘कमळा’वर बटन दाबा. मत सरळ मलाच मिळेल! हा मोदींचा संदेश देशाने स्वीकारला.

जनादेश

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट जनादेश आहे. त्यावर चर्चा करून काय फायदा? विरोधकांची एकजूट किती पोकळ होती हे पुन्हा दिसले. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्र येऊ शकले नाहीत. प. बंगालात काँग्रेस आणि तृणमूल एका व्यासपीठावर आले नाहीत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांचे महागठबंधन झाले. त्यात काँग्रेसला घेण्यास मायावती यांनी विरोध केला. आंध्रात तेलगू देसम आणि काँग्रेसचे जमले नाही. कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांची सत्ता. तेथेही लोकसभेत त्यांचे सूर जुळले नाहीत. माझाच विरोधी पक्ष खरा, असा वेगळा झेंडा घेऊन प्रत्येक जण उभा राहिला. याउलट भाजपच्या फौजा व एनडीएचे घटक दल एकदिलाने लढले. ज्या राज्यात काँग्रेसची सरकारे आहेत तेथे अंतर्गत गटबाजीने उरलेसुरले पडके वाडेही उद्ध्वस्त केले. काँग्रेस पक्षात आजही एका घराण्याचीच सरंजामशाही आहे, पण राहुल किंवा प्रियंका गांधी म्हणजे पंडित नेहरू, इंदिरा गांधी नव्हेत. ही मुले वाईट आहेत असे म्हणायचे नाही, पण देशाचे नेतृत्व करायला व काँग्रेसला पुढे घेऊन जायला सक्षम आहेत काय, हा प्रश्न आहे. पंतप्रधानांना ‘चोर’ म्हणून मतदारांवर प्रभाव टाकता येणार नाही व जोपर्यंत पक्षात नवीन कार्यकर्ते निर्माण होणार नाहीत तोपर्यंत ‘सत्ता’ सोडाच, पण विरोधी पक्ष म्हणूनही उभे राहता येणार नाही, हा धडा राहुल गांधी यांनी घ्यायला हवा. राहुल गांधी स्वतः अमेठीत पराभूत झाले. 20 वर्षे हा मतदारसंघ गांधी घराण्याकडे आहे. एखादा उद्योग सोडा, पण बऱयापैकी हॉटेलही तेथे उभे राहू शकले नाही. बाहेरून आलेल्या लोकांना बाजूच्या सुलतानपूरमधे जावे लागते, असे तेथे जाऊन आलेल्या पत्रकारांनी सांगितले. इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या अमेठीचे नव्या पिढीशी भावनिक नाते उरलेले नाही व राहुल गांधी यांचा प्रभाव कमी होत गेला. मोदी यांच्या लाटेचा तडाखा त्यामुळे अमेठीत त्यांना बसला. आता कुणाचेही गड आणि बालेकिल्ले हे कायमस्वरूपी नाहीत हे महाराष्ट्रात आणि इतरत्र दिसून आले. मोदी विजय हा त्यांचा स्वतःचा आहे. निर्विवाद आहे.

विरोधकांनी तो स्वीकारायला हवा.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.