‘महाराष्ट्रासोबत गद्दारी…’; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

भाजप नेते अनंत हेगडे यांच्या गौप्यस्फोटानुसार केंद्राकडून मिळालेला ४० हजार कोटींचा निधी परत करण्यासाठीच फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि हा निधी परत दिला. फडणवीसांविषयी करण्याच आलेला हा मोठा खुलासा पाहता आता राजकीय वर्तुळातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या घटनेसंबंधीची माहिती मिळतात तातडीने याविषयी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. अनंत हेगडे यांच्या सांगण्यानुसार ८० तासांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या फडणवीसांनी ४० हजार कोटींची रक्कम केंद्राला परत दिली? असा संतप्त सवाल उपस्थित करत ही महाष्ट्रासोबतची गद्दारी आहे ही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.