शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड सक्तीची अट नाही : मुख्यमंत्री कार्यालय

राज्यभरात सुरु केलेल्या शिवभोजन थाळीसाठी आधार कार्ड आणि फोटोची सक्ती करण्यात आली आहे. अशी बातमी सकाळपासून प्रसारमाध्यमांवर येत आहे. मात्र ही फक्त अफवा असून शिवभोजन थाळीसाठी आधारकार्डची गरज नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्यारी ‘शिवथाळी’ योजना राबविण्यात येणार आहे. या शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा आणि कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये, याची सर्व खबरदारी घेणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

अवधूतने विचारले शपथविधीवेळी आईचं नाव घेण्यामागचं कारण, आदित्यने दिले असे उत्तर

Loading...

शिवभोजन थाळी साठी लावलेल्या या अटीवर विरोधकांनीही टीकेची झोड उठवली होती. भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला. “१० रुपयात जेवणाची थाली… असे समजते की तेथेही खुप अट्टी शर्थी आहेत. आहो गरीबाला जेवू घालताय का त्याची थट्टा करताय. आमची मागणी आहे. बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे”.

“बिनशर्त, सरसकट अशा शब्दाचे आश्वासन द्यायचे आणि करायचं उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे”. असे ट्वीट कदम यांनी केले आहे.

महाराष्ट्र केसरी सदगीरला कार गिफ्ट

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.