InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘येत्या २४ तारखेला बाळासाहेबांना शिवसेनेकडून १०० तोफांची सलामी देऊ’

- Advertisement -

भारताने चंद्रावर पाठवलेले चांद्रयान कलंडले असले तरी २४ तारखेचा निकाल हाती आल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे यान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावार उतरल्याशिवाय राहणार नाही, या निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शंभर आमदार विजयी होतील. येत्या २४ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेकडून शंभर तोफांची सलामी देऊ, असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यादरम्यान केला.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Loading...

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, ‘काही बंधने आहेत, बेड्या आहेत, जपून बोलावे लागते. कारण आता आम्ही युतीत सहभागी झालेलो आहोत. आमच्या मैत्रीत कुठलाही स्वार्थ नाही, मंशा नाही. नोटाबंदी आणि राम मंदिराच्या प्रश्नावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिरावरून आवाज उठविला. त्यामुळेच इतकी वर्षे झोपलेले जागे झाले. असा टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता मारला. तसेच कलम ३७० रद्द करणं ही भूमिका सर्वात पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आत्ताचं सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालते आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.

तसंच शिवसेनेला ज्यांनी ज्यांनी दगा दिला, ज्यांनी पाठीत वार केले ते आजच्या घडीला घायाळ झाले आहेत. अस्तित्त्वासाठी चाचपडत आहेत. ‘शिवसेनेच्या विजयाची सुरूवात कणकवलीतून होईल,’ असे वक्तव्य करत त्यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. कुडाळ, नवी मुंबई, येवला येथूनही विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला आणि शिवसेना सोडून गेलेल्यांना समर्थन दिले जाणार नाही, हे दाखवून देत अप्रत्यक्षपणे यातील काही ठिकाणी युती तुटल्याचे समर्थन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.