‘शिवसेनेने राणेंचे विसर्जन कधीचं केलंय, आता कणकवलीतूनही त्यांना संपवू’

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच आता विविध मतदार संघांतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांपासून बंडखोरांपर्यंत सर्वजण एकमेकांवर टीका करु पाहत आहेत. यातच आता शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर तोफ डागली आहे.

माझं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही या राणेंच्या वक्तव्यावर निशाणा साधत, राणेंच्या नावाची दखल घेणं आम्हाला गरजेचं नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘नारायण राणे यांच्या नावाचं विसर्जन शिवसेनेने या अगोदरच केलेलं आहे त्यामुळे राणेंच्या नावाची दखल घेणे आम्हाला गरजेचं नाही’, असं ते म्हणाले. राजकारणातील विटाळेलं नाव घेऊन स्वतः अपशकुन आणण्याची शिवसेनेची मुळीच इच्छा नाही, असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.