InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘महाराजांच्या गडावर अमोल कोल्हेंचे अश्लील चाळे’, शिवसेनेचा आरोप

शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर, शिवाजी महाराजांच्या गडावर अश्लील चाळे केल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीने केला आहे.

यासाठी 5 फेब्रुवारी 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मराठी टायगर्स’ चित्रपटातील रोमँटिक गीत सादर केलं. या गीताचं चित्रीकरण ऐतिहासिक पन्हाळा गडावर झाल्याचा आणि या चित्रीकरणाला परवानगी घेतली नसल्याचा दावाही शिवसेना महिला आघाडीने केला आहे.

अमोल कोल्हे यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी महिला आघाडीने केली आहे. चित्रीकरण स्टुडिओत करुन क्रोमा केला असावा का? परवानगी घेतली नव्हती याचा काही पुरावा आहे का? असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले असता महिला आघाडीने उडवाउडवीची उत्तरं दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply