InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शिवसेनेचे माजी पदाधिकाऱ्याकडून भाजप कार्यालयात गोंधळ

आधार कार्ड काढण्यासाठी आमदारांचे शिफारस पत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास आमदारांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले शिवसेनेचे माजी पदाधिकारी सचिन राणे यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयात गोंधळ घातला. दरम्यान यावेळी आमदार हिरे व राणे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.

एका विद्यार्थ्यास आधार कार्ड काढायचे होते. त्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून आमदारांच्या दाखल्याची गरज होती. आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयातील कर्मचा-याने त्या विद्यार्थ्याला तीन वेळा परत पाठविल्याने संतप्त राणे यांनी आमदारांच्या कार्यालयात जाऊन कर्मचा-यांना जाब विचारला असता, आमदार हिरे यांच्या कार्यालयातून तसे पत्र देता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे राणे यांचे कर्मचा-यांशी वाद सुरू असताना त्याचवेळी आमदार हिरे व भाजपा पदाधिकारी महेश हिरे यांनी बाहेर येऊन राणे यांना काय चालले याबाबत विचारणा केली असता, राणे यांनी घडलेला प्रकार सांगितला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply