संत निवृत्तीनाथ पालखीला पंढरपूरला पोहचवण्यासाठी शिवशाहीने फाडलं ‘इतक्या’ हजारांचं तिकीट!

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बसमधून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 71 हजार रुपयांचं तिकीट एसटी महामंडळानं फाडल्याची माहिती आहे. यंदा कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं.

पुण्यामध्ये चालत्या एस-टी बसला भीषण आग ; दुर्घटनाग्रस्त बसमध्ये 35 प्रवासी !

शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असा समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला होता. शासनाकडून कसलाही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचं 71 हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.

नव्याने सुरवात करुन पुन्हा झेप घेऊ ; रोहित पवारांचा तरूणांना कानमंत्र

आम्ही दोन-तीन वेळा पत्र देऊन शासनानेच स्वखर्चाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केलेली होती. पण दोन-तीन बैठकांमध्ये महामंडळाने त्याबाबत असमर्थता दर्शवली, असं निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.