धक्कादायक : 2 तासांचे 2 लाख! अभिनेत्रीचं सेक्स रॅकेट उघड

मुंबई : काही दिवसांपासून पोर्नग्राफी, सेक्स रॅकेट प्रकरणात अनेक खुलासे होताना दिसत आहेत. अशीच एक सेक्स रॅकेट संदर्भातील मोठी बातमी शुक्रवारी समोर आली. मुंबईच्या क्राइम ब्रान्चने एक टॉप मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला पकडल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात इशा खान नावाच्या एका महिला दलालाही अटक करण्यात आली आहे.

सीनियर इंस्पेक्टर मनीष श्रीधनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इशा खानची माहिती मिळताच तातडीने क्राइम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला. यामध्ये त्याने टॉप मॉडल्सची मागणी केली. यानंतर इशा खानने त्यांना अनेक फोटो व्हाॉट्सअॅप केले. क्राइम ब्रान्चने यापैकी दोन फोटो सिलेक्ट केले.

यामधील एक अभिनेत्री अनेक जाहिरातीत झळकली आहे तर दुसरीने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. इशा खानने एका तरुणीसाठी दोन तासाचे दोन लाख रुपये असल्याचं सांगितलं. या दोन लाख रुपयात खानला 50 हजार रुपये दिले जातात. तर तरुणींना दीड लाखांची रक्कम दिल्याचं सांगितलं जात आहे.

खोटे ग्राहक बनून पोलीस अधिकाऱ्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये एक रुम बुक केली. गुरुवारी रात्री महिला दलाल, मॉडेल आणि अभिनेत्री जशा हॉटेलमध्ये पोहोचल्या. क्राइम ब्रान्चच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान मॉडल आणि टीवी अभिनेत्रीने सांगितलं की, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जाहिराती आणि टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे त्या या व्यवसायत आल्या.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा