धक्कादायक : गेल्या 48 तासांत तब्बल 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 24 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

भाजपच्या रणांगणातून ‘हि’ महत्त्वाची व्यक्ती गायब ; आंदोलनात सहभाग नाही

आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील 1666 पोलिस जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 16 पोलिस जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Loading...

नागपूरमध्ये कोरोनाची आतापर्यंत 73 जणांना लागण

दुसरीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. तसंच पोलिस दलातील रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखईल खूप चांगलं आहे. आतापर्यंत 478 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 35 पोलीस अधिकारी आणि 438 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.