राज कुंद्रा प्रकरणात पोलिसांना सापडली धक्कादायक गोष्ट!

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा शोध घेत आहेत. अशातच आता याप्रकरणी पोलिसांच्या हाती आणखी एक धक्कादायक गोष्ट लागली आहे.

मुंबई पोलिसांनी काल पुन्हा एकदा राज कुंद्राच्या व्हियान व जेएल स्ट्रीमच्या ऑफिसवर छापा टाकला होता. छापेमारी दरम्यान पोलिसांना राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये एक छुपं कपाट सापडलं आहे. राजच्या ऑफिसमध्ये सापडलेल्या या छुप्या कपाटामध्ये पोलिसांना बऱ्याच फाईल मिळाल्या आहेत.

पोलिसांच्या हाती लागलेल्या या बॉक्स फाईल क्रिप्टो करन्सीशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी या फाईल्स पोलिसांना खूप फायद्याच्या ठरणार आहेत. या फाईल्समधून आणखी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणी तीन लोकांना समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये मॉडेल गहना वशिष्टसह इतर दोघांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. गहना वशिष्ट याप्रकरणी जामिनावर बाहेर आली आहे. तिला आता पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा