धक्कादायक : ‘या’ अव्वल टेनिसपटूला कोरोनाची लागण

आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सोमवारी टेनिसपटून जोकोविच आणि ग्रिगोर द्विमित्रोर हे दोघंही कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. नोवाक जोकोविच सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

या आमदाराच्या कुटूंबातील चक्क १८ जणांना कोरोनाची लागण

मिळालेल्या माहितीनुसार, नोवाकच्या पत्नीलाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिला कोरोनाची लागण झाली आहे. बेलग्रेडमध्ये नोवाकने करोना चाचणी केली होती. तेव्हा त्याचा आणि पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुलांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे.

यासंदर्भात एक पत्रकही जारी करण्यात आलंय. त्यात नमूद केल्यानुसार, नुकत्यात आयोजित केलेल्या एका स्पर्धेत नोवाक सहभागी झालो होतो. त्यादरम्यान त्याने सर्व काळजीही घेतली होती. तरीही काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर सर्वांची चाचणी केल्यानंतर नोवाकचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचं समजलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.