‘अभिनेत्रींना ड्रग्स देऊन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट करतात’; पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री श्रुति गेराचा मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या पॉर्नोग्राफी प्रकरणात आता अभिनेत्री श्रुति गेराने काही खुलासे केले आहेत. यात तिने अभिनेत्रींना ड्रग्स देऊन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जाता असल्याचा खुलासा केला आहे.

वृत्तानुसार, श्रुतिला २०१८ मध्ये एका कास्टिंग दिग्दर्शकाने राज कुंद्राच्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी विचारल्याचे तिने सांगितले. “मला कोणत्या कास्टिंग डायरेक्टर्सने फोन केला होता हे आठवत नाही. मात्र, एकाने मला सांगितले की तो माझी ओळख राज कुंद्राशी करून देईन असे तो म्हणाला”.

पुढे श्रुति म्हणाली, “तर त्यातील दुसऱ्याने मला सांगितले की राज त्याचं प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याचा विचार करत आहे आणि तो वेब सीरिज सुरु करणार आहे. मी लगेच नाही म्हणाले. तेव्हा मी नाही म्हणाली यासाठी आता मी स्वत:ची आभारी आहे. आम्हाला सगळ्यांना वाटलं की तो एक चांगला आणि मोठा माणूस आहे पण तो तर अश्लील चित्रपट बनवतो,” असे श्रुतिला म्हणाली.

पुढे नवीन येणाऱ्या कलाकारांसोबत चित्रपटसृष्टीत कसे वागतात या विषयी श्रुति म्हणाली, “या चित्रपटसृष्टीत बरचं काही घडलं आहे. नवीन अभिनेत्रींना ड्रग्स दिले जातात, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जातात आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून अश्लील चित्रपट करण्यास भाग पाडले जाते. हे फक्त अभिनेत्रींना नाही तर अभिनेत्यांसोबतही केले जाते.” असा खुलासा श्रुतीने केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा