InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदी ठरले निर्दयी- सभा परिसरातील दुकाने बळजबरीने बंद, स्मशानभूमीला कुलूप तर तीन विवाह रद्द…

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणला येणार म्हणून आधी लग्न सोहळ्यांना बंदी करून वऱ्हाडी मंडळींच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या प्रशासनाने मग स्मशानभूमीत मृतदेह आणण्यास बंदी आणून निर्लज्जपणाचा कळस गाठला. आता तर मोदींची सभा असलेल्या फडके मैदान परिसरातील दुकानेच पोलिसांनी बळजबरीने बंद केली आहेत.

भाजीचे स्टॉल, किराणा दुकाने, बेकारी, हॉटेल व्यवसायावर यामुळे संक्रांत आली. मोदींच्या सभेमुळे आमच्या पोटावर पाय आल्याची संतप्त भावना यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त करत पोलीसांचा निषेध केला.

काळे कपडे घातलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मोदींच्या सभेत ‘नो एंट्री

काळे कपडे घातलेला कोणताही व्यक्ती सभेला येऊन मोदींचा निषेध करेल की काय? या धास्तीमुळे पोलिसांनी चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सभेच्या ठिकाणी येऊ दिले नाही. अनेक तरुण कार्यकर्ते, महिला यांना कल्याणमध्ये येऊन पुन्हा माघारी फिरावे लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेला काळे कपडे घातलेल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना नो एंट्री आहे. त्यामुळे काळे कपडे घातलेल्या नागरिकांना पोलिसांनी बाहेरच थांबण्यास सांगितले आहे. काँग्रेसने मोदींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काळे कपडे घातलेल्या नागरिकांना सभेला येण्यास मनाई केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

मोदी ठरले निर्दयी; लावले स्मशानभूमीला कुलूप; केले तीन विवाह रद्द….

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी कल्याणला येणार म्हणून आता तर प्रशासनाने हद्दच केली आहे. मोदी येणार म्हणून कल्याणमधील स्मशानभूमी बंद ठेवण्यात आलीय.

सुरक्षेसाठी स्मशानभूमीला कुलूप ठोकण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. मोदी कल्याणमध्ये असेपर्यंत एकही अंत्ययात्रा लालचौकी स्मशानभूमीत येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच तीन लग्न सोहळे रद्द करणाऱ्या प्रशासनाने रद्द केले.

पंतप्रधान मोदींचा दौरा जाहीर होताच पालिकेने फडके मैदान ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर मैदान आणि शेजारील वाधवा हॉल येथील तीन नियोजित विवाहसोहळे तडकाफडकी रद्द केले. याचा मोठा मनस्ताप वर आणि वधू पक्षाला झाला.

पंतप्रधानांच्या सोईसाठी ही व्यवस्था करण्यात आली असली तरी ती नागरिकांसाठी गैरसोय ठरतेय. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, पालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने कल्याणकरांना वेठीस धरल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.