Shraddha Walkar | “…असं वाटणाऱ्या मुलींसोबतच असे प्रकार घडतात”, श्रद्धा वालकर हत्याकंड प्रकरणी ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shraddha Walkar | नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या तरुणीची हत्या झाल्याची बातमी काही दिवसांपुर्वी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिची हत्या तिच्याच प्रियकराने केली असून प्रियकराने हत्येनंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. यावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री कौशल किशोर (Kaushal Kishor) यांनी या प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

ज्या मुलींना असं वाटतं की आपण आपल्या भविष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो, ती क्षमता आपल्यात आहे, असं वाटणाऱ्या मुलींसोबत असे प्रकार घडत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य किशोर यांनी केलं आहे.

तसेच, लोक लिव ईन रिलेशनशिपमध्ये का राहतायत? त्यांना तसं राहायचं असेल तर त्याची नोंदही कुठेतरी घेतली गेली पाहिजे. जर अशा व्यक्तींच्या पालकांना त्याचं नात सार्वजनिक जीवनात अमान्य असेल, तर अशा जोडप्यांनी कोर्टात जाऊन लग्न करावं आणि मग एकत्र राहावं, शिकलेल्या मुलींनी अशा प्रकारचं नातं जोडू नये. शिकलेल्या मुली आई वडिलांची मर्जी नाकारुन असा निर्णय घेत असतील तर या प्रकारांसाठी त्या स्वतः जबाबदार आहेत. शिकलेल्या मुलींनी नेमकं असं त्या का करत आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.