पराग अग्रवालसोबतच्या नात्याचा शोध घेणाऱ्यांना श्रेया घोषालने दिलं उत्तर; म्हणाली…

मुंबई : मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटर कंपनीमध्ये भारतीय व्यक्ती पराग अग्रवाल यांना सीईओपदी नियुक्ती करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल यांचा एक जुना फोटो व्हायरल होत होता. यामुळे अनेकजण पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल यांच्यात नेमकं काय कनेक्शन आहे याचा शोध घेत होते. दरम्यान श्रेया घोषालने ट्वीट करत हा शोध घेणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

श्रेयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.
“अरे यार तुम्ही लोक किती लहानपणीचे ट्वीट्स काढत आहात? त्यावेळी ट्विटर नुकतंच सुरु झालं होतं. १० वर्षांपूर्वी…त्यावेळी आम्ही लहान होतो. मित्र एकमेकांना ट्वीट करत नाहीत का? काय टाईमपास सुरु आहे,” असं सांगत श्रेया घोषालने चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र आहेत. यानिमित्ताने श्रेया घोषाल हिचे १० वर्षांपूर्वीचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. यात श्रेयाने तिची लहानपणाची मैत्री आणि पराग अग्रवालबद्दल सांगितले आहे. “आणखी एक बालपणीचा मित्र पराग अग्रवाल सापडला. खाद्यप्रेमी आणि प्रवासाची आवड असणारा. स्टॅनफोर्डचा हुशार विद्यार्थी. काल त्याचा वाढदिवस होता, कृपया त्याला शुभेच्छा द्या,” असे ट्वीट श्रेयाने केले होते.

दरम्यान पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ झाल्याचं समजताच बातमी श्रेया घोषालनेही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन पराग, आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो. हा आमच्यासाठी फार मोठा दिवस असून तो आम्ही साजरा करत आहोत,” अशा शब्दात श्रेयाने त्यांना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या