Shreyas Iyer | न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने केला ‘हा’ नवा विक्रम

ऑकलॅंड: काल भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. हा सामना ईडन पार्क येथे खेळला गेला. या सामन्यादरम्यान भारतीय संघातील सलामीवीर कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. त्यामध्ये शिखर धवनने 72 आणि गिलने 50 धावा केल्या. तर दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) च्या जागी तिसऱ्या नंबरला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने देखील अर्धशतक झळकावत एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पार पडलेल्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने 76 चेंडू मध्ये 80 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. या खेळी दरम्यान श्रेयसचा स्ट्राईक रेट 105.26 होता. श्रेयस भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याचबरोबर ही खेळी खेळल्यानंतर श्रेयसने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

 न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने केला नवा विक्रम

न्यूझीलंडच्या भूमीवर वनडे मधील श्रेयसचे हे सलग चौथे अर्धशतक होते. सलग 50 पेक्षा जास्त धावसंख्येची खेळी खेळणारा श्रेयस हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी श्रेयस ने 107 चेंडूमध्ये 103 धावा, 57 चेंडूमध्ये 52 धावा, 63 चेंडू मध्ये 63 धावा केल्या होत्या. श्रेयसने 2020 मध्ये न्युझीलँड दौऱ्यावर तीन सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

श्रेयस अय्यरच्या आधी पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार रमीझ राजाने ही कामगिरी केली होती. न्यूझीलंड दौऱ्यावर हा विक्रम करणार आहे श्रेयस दुसरा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर रजीमने वनडे मध्ये 4 वेळा 50 पेक्षा जास्त धावसंख्या केली होती. कालच्या न्युझीलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये संजू सॅमसन 38 चेंडू मध्ये 36 धावा केल्या. तर दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरने या सामन्यादरम्यान आपली सर्वोत्तम खेळी खेळत 16 चेंडूमध्ये 37 नाबाद खेळी खेळली.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.