Shrikant Shinde | “मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे…”, तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचं प्रत्युत्तर

Shrikant Shinde | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व पोट निवडणूकीत विजय झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना (Saamana) आग्रलेखातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. यावेळी लवकरच मध्यावधी निवडणुका होतील असा इशारा ठाकरेंनी दिला होता. याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिलं आहे.

यादरम्यान, काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय, आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी केलाय. तसंच मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, यासाठी सुरू केलेला टाईमपास आहे, अशी खोचक टीका श्रीकांत शिंदेंनी केली आहे.

तसेच, महाराष्ट्राला सध्या अतिशय स्थिर सरकार मिळालं आहे. त्यात शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात असून हा निव्वळ टाईमपास असल्याचं खासदार शिंदे म्हणाले. ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात आहे, असा दावा देखील शिंदेंनी केला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी आहे. ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक, असे गमतीचे विधान श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले होते. पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.