Shrikant Shinde | ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है – श्रीकांत शिंदे

मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोला लगावला आहे. राज्यामध्ये जे सरकार आले आहे ते मेज्योरिटी चे सरकार आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या ज्या गोष्टी करतील त्यांना विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. त्यांना जिथे तिथे शिंदे साहेब, स्वप्नात देखील शिंदे साहेब दिसत असतील.

गणेशोत्सव मध्ये ज्या प्रकारे ते फिरले आहेत, शासकीय कामकाज सरकारचे निर्णय घेतले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करु शकतो. हा प्रश्न विरोधकांना पडत आहे. असंही शिंदे म्हणालेत. दिवसाचे 20 तास हा माणूस काम करतो हे त्यांच्या डोळ्यात खुपायला लागले आहे. ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है. असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

.महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.