Siddharth Malhotra & Kiara Advani | सिद्धार्थ-कियारा बांधणार लग्नगाठ, ‘या’ दिवशी ठरला लग्नाचा मुहूर्त
Siddharth Malhotra & Kiara Advani | मुंबई: बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या अफेअरच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशाच या दोघांबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा पुढच्या वर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत. ते दोघे कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये लग्न करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पण अद्याप सिद्धार्थ आणि कियारा यांच्याकडून लग्नाबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘या’ दिवशी ठरला सिद्धार्थ आणि कियारा (Siddharth Malhotra & Kiara Advani) लग्नाचा मुहूर्त
मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. तर 4 आणि 5 फेब्रुवारीला त्यांचे प्री-वेडिंग सोहळे म्हणजेच हळद, मेहंदी, साखरपुडा पार पडणार आहे. यांच्या लग्नाचे कार्यक्रम राजस्थान मधील जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये पार पडणार आहे.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी 2021 मध्ये ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटानंतर या दोघांची लोकप्रियता अधिकच वाढली होती. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर त्याचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत दक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहे.
दुसरीकडे कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिचा नुकताच ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटांमध्ये ती विकी कौशलसोबत मुख्य भूमिकेत दिसली आहे. सध्या कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये ती कार्तिक आर्यनसोबत मोठ्या पडद्यावर दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात थंडीचा कडाका वाढणार?, जाणून घ्या हवामान अंदाज
- Health Care Tips | हिवाळ्यामध्ये अंगदुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Government Scheme For Farmer | ‘हे’ क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांच्या जनावरांची घेईल काळजी, जाणून घ्या नक्की काय आहे योजना
- Rishabh Pant Accident | ऋषभ पंतच्या तब्येतीबद्दल BCCI सचिव जय शाह यांनी दिली दिलासादायक माहिती, म्हणाले…
- Ather Electric Scooter | नवीन वर्षात ‘या’ दिवशी Ather लाँच करणार आहे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.