InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘सिद्धिविनायक’ दहशतवाद्यांच्या टार्गेटवर नाही, तर प्रेमाच्या खोडसाळपणाचा भाग

- Advertisement -

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्याच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

दुश्मन फतेह Jihad-Ul-Akbar-Target-Dadar SIddhi vinayak Boom असा मेसेज देऊन प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी समोर आल्याने खळबळ उडाली होती. मात्र ही धमकी नसून एकतर्फी प्रेमातून करण्यात आलेला खोडसाळपणा आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एका संशयित तरूणाला ताब्यात घेतले. हा तरूण विक्रोळीचा आहे. एकतर्फी प्रेमातून आपणच हा खोडसाळपणा केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला एका मुलीला त्रास द्यायचा होता म्हणून त्याने हा सगळा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा मेसेज लिहून त्याखाली मुलीचा मोबाईल नंबर लिहिला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.