InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

“सिगुदा” तरूण पिढी म्हणजे काय? वाचा ‘मॉर्डन’ तरुणाईवरचा हा लेख

- Advertisement -

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – तुम्हाला या लेखाच्या शिर्षकातील “सिगुदा” शब्द वाचून तुम्ही भांबावून गेला असाल ना? काय अर्थ आहे या शब्दाचा ? हा शब्द तुम्ही आधी कधी वाचला असण्याची सुतराम शक्यता नाही, कारण हा शब्द नव्यानेच तयार केलाय मी. “सिगुदा ” म्हणजे काय मग? ही कशा प्रकारची ही तरूण पिढी आहे हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल . तुमची उत्सुकता ज्यास्त न ताणता मी सांगतो मला काय म्हणायचंय . सिगुदा म्हणजे सिगारेट , गुटखा व दारु यांच्या आधीन झालेली तरूण पिढी. सिगुदा तरूण पिढी म्हणजे या तीन व्यसनांच्या आहारी गेलेली तरूणाई होय.

भारतात कुठेही जा , खेड्यापाड्यातील तरूणांना पहा नाहीतर शहरातील झोपड़पट्टी किंवा उच्चभ्रू वर्गातील तरूण पहा . या वर्गातील मॉड फँशनेबल तरूणीही पहा. या सर्वांना सिगारेट , गुटखा व दारू यांचे व्यसन लागलेले दिसते. अर्थात यालाही निर्व्यसनी तरूणांचाही अपवाद आहे, पण प्रमाण अतिशय कमी. शहरातील बड्या घरातील मुले व मुली मादक द्रव्यांच्या रेव्ह पार्ट्या करताना दिसतात. त्या संस्कृतीत तर न पिणारा म्हणजे मागासलेला मानला जातो. सिगारेटमध्ये मादक द्रव्य घालून पिणारेही काही कमी नाहीत. यात गरीब व श्रीमंत असा भेद राहिलेला नाही. यात समता पक्की आहे. समाजात समता कधी येईल हे सांगता येत नाही , पण सिगुदा तरूणांत समता आनंदानं वावरताना दिसतेय.

- Advertisement -

गावोगावच्या पानटपरी, किराणा दुकाने गुटख्यांच्या पुड्यांनी भरलेली असतात. भारताला “भारत हा गुटख्यांचा देश आहे” असे म्हणता येईल. भारतात जागजागी कचरा नि गुटखा यांचे थैमान चालू आहे. तरूण पिढी या तीन व्यसनांच्या इतके आहारी गेलेयत की अक्षरश: आपलं आयुष्य ते उध्वस्त करताहेत हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज आहे काय? कुठल्याही शहरात नाहीतर खेड्यात जा. सारी गावं दारूच्या हॉटेलांनी नि बारनी भरलेली दिसतात. सर्व धंद्यांना कधी न कधी मंदी येऊ शकते पण या धंद्यांना मंदी येईल काय? रात्र झाली की गाठ बार नि ढोस दारू नि पी सिगारेट हे घातक चित्र आपण पहात नाही काय? रस्त्यांनी चालताना पुड्यांची पाकीटे चहूदिशांनी पसरलेली आपण दररोज पहात नाही काय? १५ ते २० % युवक सोडले तर ८०% युवक “सिगुदा ” पिढी झालेली नाही काय ? हेच सिगुदा तरूण मग मद्यधुंद होऊन महिला , तरूणींवर अत्याचार करायलाही आघाडीवर असतात. आपल्या तरूण पिढीची ही व्यसनाधिनता तरूणांना नासवून टाकतेय .

ज्या देशातील तरूण असे व्यसनांच्या नादी लागून आपलं आयुष्य सडवातात , त्या देशाचं भवितव्य सुपर पॉवर होण्याचं राहू शकतं काय ? ही तरूणाईची वाटचाल आत्मघाताच्या दिशेने होतेय ही चिंतनीय बाब नव्हे काय ? आपण व्यसनी पिढी निर्माण करतो आहोत ना? तरूणांना या आत्मघातापासून कोण नि कसं वाचवणार ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.