Sim Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या

Sim Card | टीम महाराष्ट्र देशा: नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडीची गरज भासते. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी करताना आपल्या नावावर किती सिम कार्ड असतील? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. जर तुम्हाला देखील असे प्रश्न पडत असतील, तर आता काळजी करायची गरज नाही. कारण आता फक्त एका मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याबाबत माहिती मिळू शकतात.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल जारी केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, हे बघू शकतात. यासाठी तुम्हाला या https://www.sancharsaathi.gov.in/ लिंकला भेट द्यावी लागेल. जर तुमच्या बनावटी ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी सिम कार्ड वापरत असेल, तर तो नंबर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक करू शकतात. एका ओळखपत्राच्या आधारे तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकतात.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? हे तपासण्यासाठी खालील पद्धत फॉलो करा

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.sancharsaathi.gov.in/ ही लिंक ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून OTP रिक्वेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • ओटीपी मिळाल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • तिथे तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि सक्रिय मोबाईल नंबरची यादी दिसेल.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41Q3RTo