“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली”

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानातून नेहमीच भाजपवर टीकास्त्र सोडण्यात येतंय. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे.

भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्ये ऐकून लोकांची खूप करमणूक सुरु आहे. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरुच आहेत. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील, असा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार राजकीय फटकेबाजी करणार, असा अंदाज बांधला जात आहे.

तसेच, दोन वर्षांपासून ठाकरे सरकार महाराष्ट्रात काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरुन सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही, असं म्हणत राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा