पीव्ही सिंधूला मोठा धक्का

वर्ल्ड चॅम्पियन आणि भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. भारतीय एकेरी बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्यून हीने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे तिनं राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. दक्षिण कोरियाची असलेली किम गेल्या चार महिन्यांपासून सिंधूसोबत आहे.

सिंधूला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात किमने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र काही आठवड्यापूर्वी तिच्या पतीची तब्येत बिघडली. त्यामुळे किमला न्यूझीलंडला परतावं लागलं होतं.

टाइम्स ऑफ इंडियने दिलेल्या वृत्तानुसार किमच्या पतीला सहा महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. या काळात त्याची देखभाल करण्याची गरज आहे. तसेच सर्जरीसुद्धा करावी लागू शकते. अशा परिस्थितीत कुटुंबाला किमची उपस्थिती गरजेची असेल. किमने म्हटलं की तिला परत येणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.

Loading...

किमच्या या निर्णयामुळे पुलेला गोपीचंद यांच्यावर कामाचा भार वाढणार आहे. किम असल्यानं गोपीचंद यांना इतर बाबींवर बारकाईनं अभ्यास करता येत होता. यातच आता ऑलिम्पिकसाठी जास्त वेळ उरलेला नाही. त्यामुळे बॅडमिंटन असोसिएशनसमोर किमच्या जागी दुसऱ्या प्रशिक्षकाची निवड करण्याचं आव्हान आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.