साहेब! जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती; फडणवीसांचा पवारांना टोला

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी मी नेतृत्व करण्यास तयार नव्हते, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तर यावरूनच उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर का झाले?, असं भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

आता फडणवीसांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना उत्तर देत निशाणा साधला आहे. शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार म्हणाले आहेत.

यानंतर आता पवारांच्या या प्रतिक्रियेला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “साहेब! हा किती भाबडेपणा, व्दापार युगात सुईच्या टोका ऐवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले. कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले असे सांगणे म्हणजे कीती भाबडेपणा, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

तसेच पुढे मुख्यमंत्री पदावर भाष्य करताना “जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. यावेळी फडणवीसांनी कलियुग आणि व्दापार युगाचं उदाहरण देत दाखला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा