InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पवारांनी आणि मी मुख्यमंत्र्यांचा शब्द नि शब्द ऐकले – संजय राऊत

- Advertisement -

राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी आणि आपण मुख्यमंत्र्यांचा शब्द नि शब्द ऐकल्याचे राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतल्याने राज्यात नविन समिरकरण आस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका व्यक्त केली. यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे आणि सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा लागतो. मी आणि शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण पत्रकार परिषद आणि त्यातील प्रत्येक शब्द ऐकला. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.