Skin Care | त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकालाच निरोगी त्वचा हवी असते. पण अनियमित जीवनशैली आणि पोषक तत्वांचे अभावामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेच्या या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक मेकअप आणि महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, हे पर्याय त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील खाद्यपदार्थांचे समावेश करू शकतात.

रताळे (Sweet potatoes-For Skin Care)

रताळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, आयरन, बीटा-कॅरोटीन आणि विटामिन सी आढळून येते, जे आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. रताळ्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते.

अक्रोड (Walnuts-For Skin Care)

अक्रोड आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ॲसिड, सोडियम, पोटॅशियम, आयरन आणि प्रोटीन आढळून येते, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. त्वचेची नैसर्गिकरित्या काळजी घेण्यासाठी अक्रोड उपयुक्त ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने खराब झालेली त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते.

टोमॅटो (Tomato-For Skin Care)

टोमॅटोमध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि लायकोपीन आढळून येते, जे त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवते. टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात आणि त्वचा दुरुस्त होते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सूलच्या मदतीने केसांच्या खालील समस्या दूर होऊ शकतात.

केस मजबूत होतात (Hair becomes stronger-Almond oil and vitamin E capsules)

बदाम तेलामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते, जे केस मजबूत बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर केस गळतीच्या समस्यावर मात करण्यासाठी बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुल उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तुम्ही जर केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलचा वापर करू शकतात.

केसातील कोंडा दूर होतो (Removes dandruff-Almond oil and vitamin E capsules)

तुम्ही जर केसातील कोंड्याच्या समसस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही विटामिन ई कॅप्सुल आणि बदाम तेलाचा वापर करू शकतात. या तेलाने नियमित मसाज केल्याने केसातील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. विटामिन ई कॅप्सुल आणि बदाम तेलाचे मिश्रण केसांमध्ये साचलेली घाण दूर करण्यास मदत करते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या