Skin Care Rutine | उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘हे’ स्किन केअर रूटीन

Skin Care Rutine | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यामध्ये रॅशेस, टॅन, सन बर्न या समस्या उद्भवतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. अनेक लोक पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रीटमेंट घेतात. मात्र, या ट्रीटमेंट त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करू शकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील स्किन केअर रुटीन फॉलो करू शकतात.

क्लिंझिंग (Cleansing-Skin Care Rutine)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चेहऱ्याचे क्लिंझिंग करावे लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला सूट होईल असा क्लिनर खरेदी करू शकतात. क्लिंझिंगमुळे त्वचेवर साचलेली घाण सहज निघते. क्लिंझिंग केल्यानंतर चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण निघून जाण्यास मदत होते.

टोनर (Toner-Skin Care Rutine)

क्लिंझिंगनंतर टोनर वापरणे खूप महत्त्वाचे असते. टोनर आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर टोनरचा वापर केल्याने पीएच पातळी नियंत्रणात राहते आणि त्वचेवर ओलावा टिकून राहतो. कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी टोनर उपयुक्त ठरते. यासाठी तुम्ही हवे असल्यास गुलाब जलनेही चेहरा टोन करू शकतात.

मॉइश्चरायझर (Moisturizer-Skin Care Rutine)

उन्हाळ्यामध्ये त्वचेतील आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही चेहरा धुत असाल किंवा अंघोळ करत असाल तेव्हा मॉइश्चरायझर लावणे महत्त्वाचे आहे. मॉइश्चरायझरच्या मदतीने उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा मऊ राहू शकते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे.

सनस्क्रीन (Sunscreen-Skin Care Rutine)

उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना त्वचेला सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या मते, 30 पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. याचा प्रभाव 2 ते 3 तास टिकून राहतो. त्यामुळे त्वचेला दर 3 तासांनी सनस्क्रीन लावली गेली पाहिजे. सनस्क्रीनच्या मदतीने तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षित राहते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील स्किन केअर रुटीन फॉलो करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही बडीशेपचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

बडीशेपचे पाणी (Fennel water-Glowing Skin)

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बडीशेपचे पाणी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सकाळी त्या पाण्याने स्वच्छ चेहरा धुवावा लागेल. बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील डाग निघून जातात, त्याचबरोबर चेहऱ्यावरील चमक वाढते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन देखील करू शकतात. हे पाणी प्यायल्याने चेहऱ्यासोबत शरीरही निरोगी राहू शकते.

बडीशेप पावडर (Fennel powder-Glowing Skin)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही बडीशेप पावडरचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप पावडरमध्ये प्रमाणानुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.