Skin Care Tips | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी पेरूचे ‘हे’ फेसपॅक वापरा
Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: पेरू खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी देखील तुम्ही पेरूचा वापर करू शकतात. होय! पेरू तुमच्या त्वचेसाठी (Skin) खूप फायदेशीर ठरू शकतो. चेहऱ्यावरील हरवलेला रंग परत मिळवण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी तुम्ही पेरूचा फेसपॅक लावू शकतात. कारण पेरूमध्ये आढळणारे अँटीअँक्सीडेंट गुणधर्म त्वचेवरील समस्या दूर करण्यास मदत करतात. हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक आणण्यासाठी तुम्ही पुढील पेरूचे फेसपॅक वापरू शकतात.
चेहऱ्यावरील (Skin) चमक वाढवण्यासाठी पेरूचे पुढील फेसपॅक वापरा
पेरू आणि मध
पेरू आणि मधाचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक पेरू आणि एक चमचा मध घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पेरू मिक्सर मधून बारीक करून घ्यावा लागेल. त्या मिश्रणामध्ये मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे तयार झालेले मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवू शकतात. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते.
पेरू आणि ओट्स
पेरू आणि ओट्सपासून फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एक पेरू, एक टीस्पून ग्लिसरीन, एक चमचा मध आणि एक चमचा एग योक लागेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला पेरू बारीक करून एका भांड्यात काढून घ्यावा लागेल. त्यानंतर त्यामध्ये उर्वरित साहित्य टाकून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यावा लागेल. हे तयार झालेले मिश्रण तुम्हाला पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला साध्या पाण्याने चेहरा धुवावा लागेल. नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होतो.
पेरू आणि कॉर्नफ्लोर
पेरू आणि कॉर्नफ्लॉवर फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे कॉर्नफ्लोर, दोन चमचे कच्चे दूध आणि एक पेरू लागेल. त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Rishabh Pant | ऋषभ पंतसाठी पाकिस्तानी खेळाडूंनी केली प्रार्थना, सोशल मीडियावर केल्या पोस्ट शेअर
- Upcoming Mobile Launch | नवीन वर्षात लाँच होऊ शकतात ‘हे’ मोबाईल, बघा यादी
- PM Kusum Yojana | 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थितीतून मिळणार दिलासा, जाणून घ्या नक्की काय आहे योजना
- Mental Health Care | मानसिक थकवा दूर करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो
- Rishabh Pant | IPL 2023 मधून ऋषभ पंत बाहेर?, ‘हे’ खेळाडू करू शकतात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.