Skin Care Tips | चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्सपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या वातावरणामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचा (Skin) सुंदर आणि ग्लोइंग ठेवणे हे एखाद्या मोठ्या कामापेक्षा कमी नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक क्लीनिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आणि इतर अनेक उत्पादनांचा वापर करत असतात. परंतु, त्याच्या त्वचेवर फारसा परिणाम दिसून येत नाही. कारण ही उत्पादने फक्त त्वचेला बाहेरून निरोगी ठेवतात. त्वचेवरील समस्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमची त्वचा आतून नैसर्गिकरित्या निरोगी ठेवावी लागेल. यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर या घरगुती पद्धती वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्स म्हणजेच मुरूमांची समस्या देखील कमी होईल. चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती पद्धतीचा वापर करू शकतात.

लिंबू

ब्लाइंड पिंपल पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर लिंबाचा वापर करू शकतात. कारण लिंबूमध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्याच्यावरील मुरुमांची समस्या संपुष्टात आणण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या नियमित फेस पॅक मध्ये लिंबाचा रस मिसळून लावू शकतात.

मध

प्रत्येक भारतीय घरांमध्ये मध सहज उपलब्ध असते. मध आपल्या आरोग्यासाठी त्याचबरोबर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. त्वचेवरील ब्लाइंड पिंपलची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मध लावू शकतात. त्याचबरोबर मधाच्या वापराने त्वचेवरील समस्या नाहीशा करण्यासाठी तुम्ही तुमच्या नियमित फेस पॅकमध्ये मध मिसळून लावू शकतात. मधामध्ये आढळणारे पोषक घटक त्वचेवरील समस्या दूर करू शकतात.

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइल हे त्वचेवरील सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. त्याचबरोबर याच्या वापराने त्वचेवरील ब्लाइंड पिंपल्सची समस्या देखील कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही टी ट्री ऑइल तुमच्या नियमित मॉइश्चरायझरमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकतात. नियमित याचा चेहऱ्यावर वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.