Skin Care Tips | चेहऱ्यावरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा आवडते. चमकदार त्वचेसाठी लोक अनेक प्रकारच्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादन अनेकदा चेहऱ्यावरील समस्या कमी करण्याच्या ऐवजी चेहऱ्याला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या गुळाचा वापर करू शकतात. गुळ आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. गुळाच्या वापराने कोरड्या त्वचेची समस्या सहज दूर होते. त्याचबरोबर गुळाच्या वापराने चेहऱ्याला अनेक फायदे मिळू शकतात. चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी गुळाचा पुढील पद्धतीने वापर करावा.

गुळ आणि खोबरेल तेल

गुळ आणि खोबरेल तेलाचा वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा गुळ पावडरमध्ये दीड चमचा तिळाचे तेल आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर चार ते पाच मिनिटे तुम्हाला ते चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी गुळाचा वापर करणे टाळावा. कारण तेलकट त्वचेसाठी गूळ हानिकारक ठरू शकतो.

गुळ आणि कोरफड

गुळ आणि कोरफड यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा मुलायम होऊ शकते. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक चमचा गुळ पावडर एक चमचा मध आणि एक चमचा कोरफड मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या नियमित वापराने त्वचा चमकदार होऊ शकते.

गुळ आणि टोमॅटोचा रस

गुळ आणि टोमॅटोच्या रसाचे मिश्रण बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा गुळ पावडर, एक चमचा टोमॅटोचा रस, एक चमचा लिंबाचा रस, आणि चिमूटभर हळद लागेल. त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. तयार झालेली ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याची समस्या दूर होऊन चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या