Skin Care Tips | टोमॅटोचा वापर करून चेहऱ्यावरील ‘या’ समस्येपासून मिळेल सुटका

टीम महाराष्ट्र देशा: दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या त्वचा (Skin) सोबतच आपल्या चेहरा (Face) कडे दुर्लक्ष करत असतो. धूळ, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे आपल्या चेहऱ्याला आणि त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्टस वापर करतो. पण अनेकदा बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त प्रोडक्टमुळे आपल्या चेहऱ्याला हानी पोहोचू शकते. तुम्ही या केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर टाळून तुमच्या स्वयंपाक घरात एक महत्त्वाचा भाग असलेल्या टोमॅटो (Tomato) चा उपयोग करून आपल्या चेहऱ्याची निगा राखू शकता.

टोमॅटोमुळे पदार्थाला जशी चव येते. त्याचप्रमाणे टोमॅटोमुळे चेहऱ्यावर चमक येऊ शकते. कारण टोमॅटोमधील अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर टोमॅटोचा वापर करू शकता. नियमित वापराने तुमचा चेहरा निरोगी आणि चमकदार होऊ शकते.

टोमॅटोचे त्वचा (Skin) ला होणारे उपयोग

टोमॅटोच्या वापराने ओपन पोर्स भरले जाऊ शकतात

चेहऱ्यावर दिसणारी मोठी छिद्रे म्हणजेच ओपन पोर्स टोमॅटोचा उपयोग करून भरली जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला एका भांड्यात टोमॅटोचा रस काढून त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर लावून, साधारण पंधरा मिनिटे ठेवा. नंतर ते सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावर नियमितपणे हा पॅक लावल्यावर तुम्हाला फरक जाणवेल.

त्वचेला सनबर्न पासून वाचवू शकतो टोमॅटो

जर सूर्याच्या तीव्र किरणांमुळे तुम्हाला सनबर्नची समस्या निर्माण झाली असेल, तर टोमॅटो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये टोमॅटोचा रस घेऊन त्यामध्ये ताक मिसळावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर ते चेहऱ्यावर लावून व्यवस्थित सुकू द्यावे लागेल. चेहरा व्यवस्थित सूकल्यावर त्याला साध्या पाण्याने धुवा. या मिश्रणाचा नियमितपणे वापर केल्यावर चेहरा थंड राहील आणि त्याचबरोबर उन्हाचा त्रास देखील कमी होईल.

टोमॅटोमुळे ऑईली स्किनची समस्या दूर होऊ शकते

ज्या लोकांना ऑईली स्किनला सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी टोमॅटो हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त एक साधा टोमॅटो घेऊन, तो मधोमध कापून चेहऱ्यावर नियमितपणे लावावा लागेल. टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यावर तुम्हाला थोडे चिकट वाटू लागेल. पण तरीही तुम्हाला ते चेहऱ्यावर पंधरा-वीस मिनिटं ठेवावे लागेल. तुमच्या ऑईली स्किनची समस्या थोड्याच दिवसात नाहीशी होईल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.