Skin Care Tips | त्वचा चमकदार बनवण्यासाठी गाजराचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: गाजर हिवाळ्यामध्ये आवडीने खाल्ले जाते. कारण या ऋतूमध्ये गाजर सहज बाजारात उपलब्ध असते. हिवाळ्यामध्ये लोक गाजराचा सलाड गाजराचा हलवा आवडीने खातात. कारण गाजर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का? गाजर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते. होय! कारण अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये गाजराचा वापर केला जातो. गाजरापासून फेस पॅक, क्रीम, क्लिनर इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. कारण गाजर नैसर्गिक पद्धतीने त्वचेला मॉइश्चराईस करू शकते. त्याचबरोबर गाजराच्या वापराने त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या नाहीशा होऊ शकतात. तुम्ही गाजराचा रस किंवा पेस्ट वापरून त्वचेची काळजी घेऊ शकतात. याचा वापर केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतील. त्वचेची काळजी घेण्यासाठी गाजराचा पुढील प्रमाणे वापर करावा.

क्लिनर

तुम्ही चेहऱ्यावर गाजराला क्लिनर म्हणून वापरू शकतात. यासाठी तुम्हाला गाजराच्या रसाचा वापर करावा लागेल. गाजराचा रस तयार झाल्यावर तुम्हाला तो चेहऱ्यावर लावावा लागेल. चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यानंतर तुम्हाला चेहरा स्वच्छ करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ घ्यावा लागेल. नियमित असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढू शकते.

स्क्रब

तुम्ही गाजराचा स्क्रब म्हणून देखील वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला गाजर किसून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला किसलेल्या  गाजराने चेहऱ्यावर मसाज करावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये तांदळाचे पीठ मिसळू शकतात. गाजराच्या किसाने स्क्रब केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डेट सेल्स निघून जाऊ शकतात.

फेस पॅक

तुम्ही गाजराचा फेस पॅक म्हणून वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला गाजर किसून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मध आणि दूध मिसळावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला किमान अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून किमान एकदा गाजराचा फेस पॅक लावल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.