Skin Care Tips | ‘या’ गोष्टींचा वापर करून चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने घ्या काळजी
Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्यावरील (Skin) निस्तेजपणा दूर करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील चमक (Glow) वाढवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीचे चेहऱ्याची काळजी घेत असतात. कुठलाही कार्यक्रम असो चेहरा चमकवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न नक्की करतो. पण अनेकदा पार्लरमध्ये जाऊन किंवा रसायनिक उत्पादन वापरून चेहऱ्यावर प्रक्रिया केल्याने चेहऱ्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे नेहमी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे. पुढील गोष्टींचा वापर करून तुम्ही घरच्या घरी चेहरा चमकवू शकतात. या गोष्टींचा वापर केल्याने तुमचा चेहरा अधिक मऊ आणि चमकदार होऊ शकतो.
बेसन
बेसनाच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये एक चमचा दही मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकार मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला साध्या पाण्याने चेहरा धुवावा लागेल. त्याचबरोबर तुम्ही बेसनाचा फेसपॅक देखील बनवू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मलाई मिसळून घ्यावी लागेल. हा फेस पॅक व्यवस्थित मिसळल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल.
कोरफड
कोरफडीच्या मदतीने चेहरा चमकवण्यासाठी तुम्हाला कोरफड जेलमध्ये मध आणि हळद पावडर मिक्स करून घ्यावी लागेल. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर लावून त्याची मसाज करावी लागेल. दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल.
मुलतानी माती
नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा दही मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटे मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Rishabh Pant | दिल्लीत ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, डोक्याला झाली गंभीर दुखापत
- PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, मोदींनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
- Ajit Pawar | TET घोटाळा आमच्या काळात झाला असले तरी चौकशी करा – अजित पवार
- Winter Session 2022 | बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश होणार ; विधानसभेत मोठा निर्णय
- ICC Award 2022 | ‘क्रिकेटर ऑफ द इयर 2022’ नामांकन यादीत ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाले स्थान
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.