Skin Care Tips | ‘या’ घरगुती गोष्टी वापरून चेहऱ्यावर आणा चमक

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतो. आपण आपल्या डोळे Eye, केस Hair,चेहरा Face आणि स्किन Skin साठी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा उपयोग करतो. पण अनेकदा हे प्रॉडक्ट अनेकदा आपल्या त्वचेला सहन होत नाही आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. प्रामुख्याने यामध्ये आपण आपल्या चेहऱ्यासाठी बरेच काही करत असतो. आपल्या चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक रित्या चमक मिळवू शकतात. त्याचबरोबर या घरगुती पद्धतींचा तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.

तांदळाचे पीठ

त्वचेला चमकदार बनवण्यासाठी तांदळाचे पीठ एक रामबाण उपाय आहे. तांदळाच्या पिठाचा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा मीठ मिसळा. तांदळाचे पीठ आणि मधामध्ये गुलाब जल टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्या. हे फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर सुमारे वीस मिनिटं राहू द्या. फेसपॅक सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यानंतर चेहऱ्यावर तुमच्या आवडीचे मॉइश्चरायझर लावा. या फेसपॅक च्या वापरानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

पांढरे तीळ

तुम्ही जर नियमितपणे तुमच्या चेहऱ्यावर तिळाचा फेसपॅक लावला तर तुमच्या त्वचेवरील चमक वाढून तुमच्या सौंदर्यात भर पडेल. या फेसपॅक साठी सर्वप्रथम पांढरे तीळ चांगले बारीक करून घेऊन त्यामध्ये थोडी हळद मिसळा. हे मिश्रण तयार झाल्यावर ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील हे फेसपॅक पूर्णपणे सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. या फेसपॅक मुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक तर येईलच पण त्याचबरोबर चेहऱ्यावरील कोरडेपणा देखील दूर होईल.

केळी

जर तुम्ही टॅनिंगच्या समस्या पासून त्रस्त असाल तर केळीचा फेसपॅक तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एक केळी मॅश करून त्यामध्ये एक चमचा मैदा आणि बेसन मिक्स करा. हा तयार झालेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा. या फेसपॅक चा नियमित वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.