Skin Care Tips | ‘या’ बियांच्या वापराने चेहरा राहू शकतो निरोगी, जाऊन घ्या पद्धत

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असोवा पुरुष प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याचे (स्कीन) सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. यासाठी अनेकजण मेकअप करतात. तर, अनेकलोक स्किन केअर रुटीनचे पालन करतात. त्याचबरोबर काही लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले रसायनयुक्त उत्पादन वापरतात. पण या उत्पादनांचा परिणाम जास्त वेळ राहत नाही. त्याचबरोबर या उत्पादनाच्या वापराने चेहऱ्याला हानी पोहोचण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्ही नैसर्गिक पद्धतीने तुमच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेले बियांच्या (Seeds) मदतीने चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात. होय! स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या या छोट्या बियांच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहरा निरोगी ठेवू शकतात.

जिरे

जिऱ्याचा वापर प्रामुख्याने जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? जिऱ्याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील चमक वाढू शकतात. जिरे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर जिऱ्याच्या नियमित वापराने कोरडी त्वचा, डेड स्कीन यासारख्या समस्या देखील कमी होऊ शकतात. जिऱ्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होऊन, चेहऱ्यावर चमक येऊ शकते. यासाठी तुम्हाला जिरे बारीक करून त्यामध्ये बदाम तेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर किमान दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावी लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल.

मेथी दाणे

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही मेथी दाण्याची पेस्ट चेहऱ्यावर लावू शकतात. मेथीच्या बियांची पेस्ट लावल्याने मुरूम आणि डाग यासारख्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर मेथीदाण्यांची पेस्ट ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला रात्रभर मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी मेथी दाणे बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यावी लागेल. तयार झालेली ही पेस्ट तुम्हाला किमान पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल.

बडीशेप

जेवणानंतर बडीशेपचे सेवन करणे चांगले मानले जाते. बडीशेप पचण्यासाठी चांगली मानली जाते. त्याचबरोबर बडीशोप चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी देखील मदत करू शकते. बडीशेपचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग यासारख्या समस्या कमी होतील. यासाठी तुम्हाला बडीशोप बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर त्यामध्ये दही आणि मध मिसळावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. नियमित बडीशेपचा हा फेस पॅक वापरल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये सुधारणा जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.