Skin Care Tips | ‘या’ स्टेप्स फॉलो करून घरीचं करा फेशियल

Skin Care Tips । टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. यामध्ये खरेदी विक्री पासून आपल्या स्किन केअर पर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. विशेषतः महिलांना या सणासुदीच्या दिवसांमध्ये सुंदर दिसायला आवडते. त्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणे पसंत करतात. मात्र अनेक वेळा पार्लरमध्ये वापरले जाणारे केमिकल युक्त प्रोडक्ट्स तुमच्या स्किनला हनी पोहचवू शकतात. यामुळे तुमची स्किन सुद्धा खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी फेशियल करू शकता. यासाठी तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध असलेले काही प्रॉडक्ट घरी आणून त्यांच्या मदतीने घरच्या घरी फेशियल करता येईल.

पुढील पद्धती वापरून घरच्या घरी करा फेशियल ( Skin Care Tips )

क्लिजिंग

तुम्ही जर घरच्या घरी फेशियल करणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला क्लिजिंग करावी लागेल. क्लिजिंग करण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असलेले क्लिजिंग मिल्क वापरू शकता किंवा कच्च्या दुधाने देखील चेहरा क्लीन करू शकता. यासाठी तुम्हाला क्लिजिंग मिल्क किंवा दूध चेहऱ्याला लावून त्याची थोड्यावेळ मसाज करावी लागेल. त्यानंतर पाच मिनिटे ते तसेच राहू देऊन नंतर त्याला कापसाने स्वच्छ करावे लागेल.

स्क्रब

क्लिजिंग नंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब करावे लागेल. स्क्रब करण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले स्क्रब वापरू शकतात किंवा तुम्ही घरच्या घरी देखील स्क्रब तयार करू शकतात. तुम्ही बेसन, पिठीसाखर, तांदळाचे पीठ इत्यादी गोष्टी वापरून घरी स्क्रब तयार करू शकतात. स्क्रब करण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार लिंबू, काकडीचा रस, गुलाब पाणी किंवा दही लावून त्याची मसाज करावी लागेल. त्यानंतर तयार केलेले स्क्रब पुन्हा चेहऱ्याला लावून त्याची मसाज करावी लागेल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुतल्यावर तुमचे स्क्रब पूर्ण होईल.

मसाज

फेशियल मध्ये मसाज करणे सर्वात महत्त्वाचे आहे. मध, लिंबाच्या रसाचे काही थेंब, आणि कच्च्या बटाट्याचा रसासोबत थोडे गुलाब जल मिसळून घ्या. यानंतर हे मिश्रण लावून वरच्या दिशेला मसाज करा. किंवा गोलाकार पद्धतीनेही तुम्ही मसाज करू शकता. मसाज झाल्यानंतर तुम्ही थोडा कापूस गुलाबजलमध्ये भिजवून डोळ्यांवर ठेवू शकता. बारा ते पंधरा मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यानंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. मसाज झाल्यानंतर चेहऱ्यावर तुमची आवडती कुठलीही मॉइश्चरायजर क्रीम लावा.

फेसपॅक

फेस पॅक लावण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले फेसबुक वापरू शकता किंवा तुम्ही घरी देखील फेसबुक बनवू शकता. घरी फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही दही, चंदन, पावडर आणि एलोवेरा जेल एकत्र करून त्यांचे मिश्रण तयार करू शकता. हे मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. चेहरा थोडा सुखायला लागल्यावर स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर चेहऱ्यावर तुमच्या आवडीचे मॉइश्चरायजर लावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.