Skin Care Tips | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बेसनाचा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच चमकदार आणि निरोगी त्वचा (Skin) हवी असते. पण चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे त्वचेची संबंधित समस्या वाढू लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेले केमिकल युक्त उत्पादने वापरतात. पण या उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेवरील चमक कमी  होते आणि त्वचा निस्तेज दिसायला लागते. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक पद्धतींचा वापर करून त्वचेची काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. कारण बेसनामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी बेसनाचा पुढील प्रमाणे वापर करा.

बेसन आणि हळद

चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी बेसन आणि हळद एक रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये चिमूटभर हळद आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होऊ शकतात.

बेसन आणि मग

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही बेसन आणि मधाचा उपयोग करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसन आणि एक चमचा मध व्यवस्थित मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हा फेस पॅक चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावा लागेल. बेसन आणि मध हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावू शकतात. हा फेसपॅक नियमित चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.

बेसन आणि मलाई

बेसन आणि मलाई चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसन आणि एक चमचा मलाई मध्ये काही थेंब गुलाबजल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावावे लागेल. या फेस पॅकने तुम्ही चेहऱ्यावर स्क्रब देखील करू शकतात. हा फेस पॅक चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि कोरडेपणाची समस्या दूर होईल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या