Skin Detoxification | उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा ‘या’ पेयांचे सेवन

Skin Detoxification | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी (Skin Care) अधिक घ्यावी लागते. कारण उष्णतेचा परिणाम पोटासोबत त्वचेवरही मोठ्या प्रमाणात होतो. उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी (Dry Skin) आणि निर्जीव होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी त्वचा डिटॉक्स करणे खूप महत्त्वाचे असते. त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकतात. उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील पेयांचा आहारात समावेश करू शकतात.

भोपळ्याचा रस (Pumpkin juice-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी भोपळ्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने पोट थंड राहते आणि शरीर अनेक आजारांपासून दूर होते. या रसामध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन सी, झिंक भरपूर प्रमाणात आढळून येते. भोपळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार होते.

लेमन टी (Lemon Tea-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये लेमन टीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पोट थंड ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया मजबूत बनवण्यासाठी लेमन टी मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, अँटी व्हायरल, अँटीऑक्सिडेंट, विटामिन सी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये नियमित याचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

नारळ पाणी (Coconut water-Skin Detoxification)

नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करू शकतात. नियमित नारळ पाण्याचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते. त्याचबरोबर कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही वरील पेयांचा आहारात समावेश करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये ताकात कढीपत्ता मिसळून प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते (Increases immunity-Buttermilk With Curry Leaves Benefits)

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे रोगपतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये ताकात कढीपत्ता मिसळून प्यायल्याने तुम्ही सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. उन्हाळ्यामध्ये कढीपत्त्याच्या ताकाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Buttermilk With Curry Leaves Benefits)

ताकामध्ये फॅट आणि कॅलरीज खूप कमी प्रमाणात आढळून येते, जे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये महानिम्बाइन नावाचा अल्कलॉइड आढळून येते, जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. उन्हाळ्यामध्ये कढीपत्ता आणि ताक प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या