Skoda Kushaq | Skoda Kushaq लवकरच दिसणार नव्या अवतारात

टीम महाराष्ट्र देशा: देशातील वाहन उत्पादन कंपन्या आपल्या ग्राहकांना कंपनीचे अपडेटेड वर्जन देण्याचे सतत प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी स्कोडा Skoda आपली Skoda Kushaq SUV अपडेटेड वर्जन बाजारात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी या नव्या अपडेटेड मॉडेलवर काम करताना दिसत आहे. चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. स्पॉटेड मॉडेल नुसार या गाडीच्या लुक आणि स्टाईल मध्ये बरेचसे बदल करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

लुक

स्कोडा Skoda च्या या अपडेटेड कारच्या लुक बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये क्रोम-बंद बटरफ्लाय ग्रिल, मस्क्युलर बोनेट, रुंद एअर डॅम, ब्लॅक प्लास्टिक स्किड प्लेट, ड्युअल-पॉड हॅलोजन हेडलाइट्स आणि फॉग लाइट्स इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर या SUV च्या मागच्या बाजूला रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स आणि शार्क-फिन अँटेना देण्यात आलेला आहे. यामुळे या गाडीचा लुक अधिकच आकर्षित दिसत आहे.

इंजिन

या SUV च्या इंजिन बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 1.0L 3-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन आहे. जे 144bhp ची मॅक्झिमम पावर जनरेट करून 178Nm चा टार्क निर्माण करते. त्याचबरोबर यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल (MT) किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

फीचर्स

या कारमध्ये 5 सीटर आरामदायी केबल देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये ऑल-ब्लॅक डॅशबोर्ड, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील आहेत. त्याचबरोबर या SUV मध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम प्री-फिट देखील कंपनीकडून देण्यात आलेले आहे.

किंमत

सध्या या कारच्या किमती बद्दल कंपनीकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या या कारच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 9.99 (एक्स शोरुम) लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.