InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

….तरीही गुलामी जमणार नाही- बच्चू कडू

- Advertisement -

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीका केली आहे.

“सदाभऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल, मात्र मला गुलामी करायला जमत नाही.” अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावात आमदार बच्चू कडू बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शेतमालाचा भाव, कर्जमाफीवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या वाटेला जाल तर उभा चिरु, असा म्हणणारा कार्यकता तयार झाला पाहिजे, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला. तसेच सरकार तुमच्या घराला सोन्याची कौले बांधून देऊ शकते, मात्र तुमच्या मालाला भाव देऊ शकत नाही, कारण सोन्याच्या कौलात कमिशन मिळतं, अशी टीका बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर केली.

तसेच मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर देखील जळजळीत टीका कडू यांनी केलीये. मला देखील सदाभाऊ खोत सारख मंत्री पद मिळेल मात्र मला गुलामी करायला जमत नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.